ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आता नैसर्गिक आपत्तींची आधीच मिळणार माहिती – राज्य सरकार लाँच करणार स्वतःचा हवामान उपग्रह

हवामान खात्याचा अतिवृष्टी संदर्भात अनेकदा अंदाज चुकत आहे. त्यामुळे नुकसान टाळता येण्यास मर्यादा येत आहे. यावर उपाय म्हणून आता राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून एक सॅटेलाईट तयार करण्यात येणार आहे.

यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी काल शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पहा काय म्हणाले मदत व पुनर्वसन मंत्री

अतिवृष्टी, पूर, भूकंप आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीची माहिती आधीच मिळाली तर उपाययोजना करून नुकसान टाळता येते.
या ‘सॅटेलाईट’ द्वारे भूगर्भातील घडामोडी, हवामानाचा अचूक अंदाज, पाऊस आदींबाबत किमान २४ तासापूर्वी तसेच जास्तीत जास्त एक आठवड्यापूर्वी माहिती उपलब्ध होऊ शकते.

या कामासाठी एका शास्त्रज्ञाची नियुक्ती केली जाईल. तसेच कृषीसह विविध विभागांना या उपग्रहाचा फायदा होऊ शकतो, अशा सर्व विभागांनाही यात सहभागी केले जाईल.

हा उपग्रह तयार करायला वेळ लागेल. याशिवाय केंद्राकडूनही काही परवानग्या घ्याव्या लागतील, त्यानंतरच याबाबत काम सुरू होईल, असेही अनिल पाटील यांनी सांगितले आहे.