ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आता फक्त बारावीलाच बोर्ड परीक्षा असणार, नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जाणून घ्या..!!

 नवीन शैक्षणिक धोरणानुसार, पदवी चार वर्षांची करण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग अकरावी ठरेल, तर दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करुन फक्त बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे.

 उच्च माध्यमिक कायमचे बंद
नव्या धोरणानुसार, पूर्व प्राथमिकचा पहिला टप्पा पहिली ते पाचवी, प्राथमिकचा दुसरा टप्पा सहावी ते आठवी, त्यानंतर माध्यमिकचा नववी ते अकरावी, असे टप्पे असतील. तर बारावी आता पदवीला जोडली असून, त्यामुळे आता उच्च माध्यमिकचा टप्पा नसेल.

 शेवटच्या वर्षी अकरावी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य होते. मात्र, बारावीला बोर्डाची परीक्षा जाहीर केल्याने प्राथमिक व माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होतील. या निर्णयाचा फटका माध्यमिक शाळांना बसण्याची शक्यता आहे.

 सध्याचे शैक्षणिक धोरण 1986 पासून राबवण्यात येत होते. आता त्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून (2022-23) बदल होणार आहेत. नव्या धोरणानुसार, आता 5+3+3+4 असे शैक्षणिक टप्पे असणार आहेत.