ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

NREGA JOB CARD : जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसं बनवायच ? पहा संपूर्ण माहिती

NREGA JOB CARD : मित्रांनो, भारतात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग असल्यामुळे भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून संबोधल जाते. त्यामुळे राज्यशासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत जॉब कार्डपासून, विहीर, फळबाग इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे आपणास नरेगा जॉब कार्डबद्दल जाणून घेणार आहोत.

NREGA JOB CARD काय आहे ?

आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत बनविले जाणारे कार्ड आहे. गावातील ग्रामपंचायतमध्ये जे नागरिक रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करतात त्यांना जॉब कार्ड नोंदणी करून एक पुस्तक दिल जातो. पुस्तकामध्ये प्रत्येक नागरिकाचा जॉब कार्ड नंबर असतो, त्याच्या मदतीने आपल्याला कामाला किती दिवस झाले ? कोणते काम झाले ? पैसे किती मिळाले इत्यादी माहिती ऑनलाईन पाहता येते.

जॉब कार्डचे फायदे ( Benefits of nrega Card)

मित्रांनो, तुम्ही जर दारिद्र्यरेषेखालील किंवा वंचित गटातील नागरिक असाल आणि तुम्हाला नरेगाअंतर्गत मजुरी हवी असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक असतं. जॉब कार्ड नसेल, तर मजुरीची काम मिळत नसतात. NREGA अंतर्गत चालणाऱ्या विविध योजना व वैयक्तिक लाभ मिळवायचा झाल्यास लाभार्थ्यांकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवड योजना, विहीर अनुदान योजना इत्यादी वैयक्तिक योजनेसाठीसुद्धा जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे.

जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्र (Documents)

  • आधारकार्ड
  • अर्जाचा नमुना नं. 1
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्डची छायांकित प्रत
  • मतदान ओळखपत्र
  • मोबाईल क्रमांक

जॉब कार्ड ऑनलाईन कसं बनवायचं ? How To Apply for MGNREGA Job Card Online

तुम्हाला तुमचा नवीन जॉब कार्ड काढायचा असेल किंवा ग्रामपंचायतच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल, अशावेळी तुम्हाला तुमचं जॉब कार्ड काढण्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायतीला भेट द्यावी लागेल. ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून जॉब कार्ड बनवण्यासाठी अर्जाचा एक नमुना देण्यात येईल, तो अर्जाचा नमुना संपूर्ण आवश्यक माहिती व कागदपत्रासह जोडून त्यांच्याकडे जमा करावा लागेल.

 हे पण वाचा : शेतकऱ्यांना आयुष्यभर दरमहा 3,000 रु. पेन्शन देणारी योजना

अर्जाचा नमुना जमा केल्यापासून पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचा जॉब कार्ड तयार करण्यात येईल. सोबतच जॉब कार्डचा नंबरसुद्धा तुम्हाला दिला जाईल, या नंबरचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता.


NREGA जॉब कार्ड मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतो का ?

हो, जॉबकार्ड मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतो.

जॉब कार्डचा वापर कुठे केला जातो ?

जॉब कार्डचा वापर ग्रामपंचायतमध्ये नरेगाअंतर्गत येणाऱ्या कामासाठी व ग्रामपंचायत पंचायत समिती इत्यादीच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागतो.

जॉब कार्डसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येतं का ?

नाही, जॉब कार्ड फक्त ग्रामपंचायतमार्फत दिल जाते, त्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतमध्ये अर्ज करावा लागतो.

जॉब कार्ड नंबर ऑनलाईन काढता येतो का ?

हो, जॉब कार्ड क्रमांक ऑनलाईन काढता येतो.