नवीन विहीर अनुदान योजना सह इतर विविध योजनांचा मिळणार लाभ.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत कोणत्या बाबीसाठी किती अनुदान मिळते त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहे.
- नवीन विहीर – 2.50 लाख रुपये.
- जुनी विहीर दुरुस्ती – 50 हजार रुपये.
- इनवेल बोअरींग 20 हजार रुपये.
- पंप संच 20 हजार रुपये.
- वीज जोडणी आकार 10 हजार रुपये.
- शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण 1 लाख रुपये.
- सुक्ष्म सिंचन संच अंतर्गत ठिबक सिंचन संच- 50 हजार रुपये
- तुषार सिंचन संच 25 हजार रुपये.
- पीव्हीसी पाईप 30 हजार रुपये.
- परसबाग 500 रुपये.
वरीलप्रमाणे विविध योजनांचा लाभ लाभार्थींना दिला जातो. त्यामुळे अर्जदारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून द्यावेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत मिळणार नवीन विहीर अनुदान योजना
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असतात.
यापैकीच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना होय. या योजना अंतर्गत अनुसूचित जातीचे लाभार्थी शेतकऱ्यांसाठी व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जातीचे लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, तुषार सिंचन, ठिबक सिंचन योजनेचा लाभ देण्यात येतो.
या प्रवर्गातील शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती होण्यासाठी तसेच या योजनांमधील सहभाग वाढविण्यासाठी येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत कृषी सामाजिक समावेषण सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
त्यामुळे ज्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांनी शासनाच्या महाडीबीटी या पोर्टल वरील कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला नाही त्यांनी अर्ज करावेत. असे आवाहन कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
खालील प्रमाणे करा योजनेसाठी अर्ज
नवीन विहीर किंवा जुनी विहीर दुरस्ती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी वेब पोर्टलवर अर्ज कसा करावा लागणार आहे त्यासाठी हा अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
हा अर्ज व्यवस्थित समजावा यासाठी या लेखाच्या शेवटी एक व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ देखील नक्की पहा म्हणजे अर्ज प्रक्रिया अधिक सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल.
- सगळ्यात आधी महाडीबीटी पोर्टला भेट द्या.
- युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- लॉगीन केल्यावर अर्ज करा अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असा पर्याय दिसेल. त्यासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही वरील पर्यायावर क्लिक कराल एक सूचना दिसेल ती वाचून घ्या आणि ओके या बटनावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही ओके या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमचे गाव, तालुका, गट नंबर इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी अगोदरच दिसेल.
- बाब या पर्यायावर क्लिक करतातच विविध योजनांची लिस्ट दिसेल त्यावर क्लिक करा आणि अर्ज सादर करून द्या.
नवीन विहीर खोदकाम अनुदान किती मिळणार आहे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत नवीन विहीर खोदकाम करण्यासाठी २.५० हजार एवढे अनुदान मिळते.
योजनेसाठी कोठे अर्ज करावा लागतो?
योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी वेब पोर्टलवर अर्ज करणे गरजेचे आहे.
या योजनेसाठी पात्र व्यक्ती कोण आहेत?
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यति नवीन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकतात.
कागदपत्रे कोणकोणती लागतात?
सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
2) 7/12 व 8-अ चा उतारा.
3) 1.50 लाखाचे तहसीलदार यांचेवतीने दिलेले मागच्या वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
4) 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
5) अर्जदार जर अपंग असेल तर असल्यास प्रमाणपत्र.
उर्वरित कागदपत्रे
6) तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला 0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र आवश्यक ज्या जागेवर नवीन विहीर घेणे आहे. त्या जागेपासून ५०० मीटर अंतरावर विहीर नसल्या बाबतचे प्रमाणपत्र. विहीर ज्या जागी घ्यायची आहे त्या जागेचा नकाशा व चतु:सीमा.
7) पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र. सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील.
8) कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र.
9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र.
10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो महत्वाच्या खुणेसह व लाभार्थी सह).
11) ग्रामसभेचा ठराव आवश्यक.