ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मुलचेराच्या वतीने श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुग्णांना फळ वाटप

मुलचेरा:-स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा च्या वतीने धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी चे अध्यक्ष तथा माजी आदिवासी व वन राज्यमंत्री तथा युवा हृदय सम्राट, अहेरी इस्टेट चे राजे आदरणीय माननीय श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त 15 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ प्रकाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वैधकिय अधीक्षक डॉ ललित मल्लिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला आणि सोबतच ग्रामीण रुग्णालय येथील परिसर साप सफाई करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. हिराचंद वेस्कडे, डॉ.अरुण लाडे,डॉ. अजय मुरकूटे,डॉ. हेमंत गजाडीवर, प्रा. अशोक धोटे, प्रा प्रवीण कुमरे,आनंद तावाडे, मारोती खिरटकर, सुरेश मुरमुरवार, कविता उईके तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.