गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र दिनी आशा स्वयंसेविकांचा सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव दुर्गम भागासाठी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण

गडचिरोली दि .१ : गडचिरोली येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस मुख्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रमात आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेंचा सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच दुर्गम भागासाठी पाच अत्याधुनिक रुग्णवाहिकेंचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी संगीता सोनल भैसा गाव विहिटेकला प्रा आ केंद्र बोटेकसा तालुका कोरची, नंदा घनश्याम नैताम गाव. जिवनगठ्ठा प्रा केंद्र तोडसा ता एटापल्ली,
वैजंता बिलास उसेंडी गाव- झरी प्रा आ केंद्र करावफा तालुका धानोरा, राजुबाई दुर्गय्या पुल्लू्रवार प्रा आ केंद्र महागाव ता अहेरी,मीरा वंजा कुड्यामी प्रा केंद्र आरेवाडा तालुका भामरागड या दुर्गम भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशांना गौरविण्यात आले व त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ प्रफुल्ल हुलके, डॉ सुनील मडावी,सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रफुल्ल गोरे,साथरोग अधिकारी डॉ रुपेश पेंदाम ,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी शंतनू पाटील, विस्तार अधिकारी प्रांजन शेडमाके तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.