गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दारू व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व सत्संग कार्यक्रम आष्टी येथे प्राध्यापक अशोकरावजी धोटे सर यांच्या राहत्या घरी आयोजेन

आष्टी:-
राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना, आष्टी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने प्राध्यापक अशोकरावजी धोटे सर आष्टी यांच्या राहत्या घरी दिनांक 21 मार्च 2023 रोज मंगळवारला कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाऊराव ठाकरे सर आष्टी राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना जिल्हाध्यक्ष जिल्हा गडचिरोली उद्घाटक माननीय अनिल भाऊ डोंगरे जिल्हा अध्यक्ष परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर
प्रमुख अतिथी माननीय पंडितभाऊ काळे जिल्हा कोषाध्यक्ष परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर माननीय दिगंबरजी वासेकर जिल्हा संघटक परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर
माननीय सौ बेबीताई बुरांडे सरपंच ग्रामपंचायत आष्टी सौ.अनिताताई मडावी शिवनी सौ अनिताताई पोतराजवार आष्टी माननीय अविनाश राऊत जिल्हा सचिव चंद्रपूर, प्रकाश अलगमकर जिल्हा सदस्य चंद्रपूर, माननीय गजाननभाऊ रामटेके तालुका अध्यक्ष अहेरी, माननीय श्रीधरभाऊ मोहु्र्ले सचिव महागाव, भोजराज एकोणकर तालुकाध्यक्ष राजुरा, आनंदराव सोनुर्ले तालुका सचिव राजुरा,भालचंद्र रोहणकर जिल्हा प्रचारक परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर, मारुतीभाऊ वाकुडकर तालुका अध्यक्ष पोभुर्णा, डबाजी मुनघाटे पाटील शिवनी, मंगेश ताकलपल्लीवार जिल्हा सदस्य गडचिरोली, नामदेवभाऊ बोरकुटे जिल्हा सदस्य गडचिरोली, संजय दुर्गे आष्टी, अंकलू पेरगावार अध्यक्ष आष्टी, सुरेश औतकर आष्टी, महिंद्रा आत्राम आष्टी श्री गोसाई टेंबरे कढोली आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती गजानन भाऊ रामटेके तालुका अध्यक्ष अहेरी श्रीधर मोहरले महागाव अंकलु पेरगावार आष्टी
भालचंद्र रोहनकर जिल्हा प्रचारक चंद्रपूर मारुती वाकुडकर तालुका अध्यक्ष पोभुर्णा डमाजी मुनघाटे पाटील शिवनी सौ अनिताताई मडावी शिवनी भोजराज एकोणकर राजुरा
सो बेबीताई बुरांडे सरपंच आष्टी
दत्तूभाऊ ठेगंणे सत्संग संचालक सालेझरी पवन आसुटकर प्रचारक राजुरा सौ अनिताताई पोतराजवार आष्टी सुरेश औतकर आष्टी या सर्वांचा
शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय दिगंबरजी वासेकर जिल्हा संघटक चंद्रपूर यांनी राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सत्संगाचा लाभ घ्यावा असे सर्व उपस्थित गुरुबंधू व शिवभक्त भगिनींना असं मोलाचे मार्गदर्शन केले पंडितभाऊ काळे जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रपूर यांनी स्वतःचे पूर्वी व आत्ताचे जीवन चरित्र सांगितले आज मी तुमच्यासमोर उभा आहे तो फक्त आणि फक्त गुरुवर्य संतोषजी महाराज व सद्गुरु परमपूज्य शेषराव महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने असे अत्यंत मोलाचे उपस्थित बंधू भगिनींना मार्गदर्शन केले माननीय अनिलभाऊ डोंगरे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला चंद्रपूर व गडचिरोली दोन्ही जिल्ह्याचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते व्यसनमुक्तीच्या कार्याकरिता अहोरात्र प्रयत्न करीत असतात असे मोलाचे योग्य मार्गदर्शन केले भाऊराव ठाकरे सर जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, करण गांगुलवार, साईनाथ बोमनवार, प्रमोद गुंडावार, अमोल कन्नाके, प्रशांत डमारे, नरेंद्र कत्रोजवार आष्टी या सर्वांच्या एकजुटीने तसेच प्राध्यापक अशोकराव धोटे सर यांच्या प्रेरणेने व प्रयत्नाने आष्टी येथे राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्तीवर सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व उपस्थित बंधू भगिनींना सर्व गुरु बंधूंना एकत्र येऊन समोर उत्साहात गडचिरोली संघटना जास्तीत जास्त वाढवून राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार करूया असे मोलाचे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाकरिता उपस्थित आष्टी संघटनेचे सर्व पदाधिकारी, महागाव संघटनेचे सर्व पदाधिकारी, उमरी संघटनेचे पदाधिकारी, परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना सो्ंदरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना पि्ंपरी तालुका पोंभुर्णा, तसेच राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महारा व्यसनमुक्ती संघटना नवेगाव मोरे तालुका पो्ंभुर्णा, राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना वेलतुर (तुकुम) तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली, राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना फोकुरडी

तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली, शिवनी येथील सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते

राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना सत्संग टीम सालेझरी यांनी आपल्या सुरेल आवाजात परमपूज्य शेषराव महाराज यांचा सत्संग कार्यक्रम सादर केला सत्संगानंतर लगेच मान्यवरांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला पुनश्च एकदा प्राध्यापक अशोकराव धोटे सर तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गुरुबंधू शिवभक्त बंधू महिला भगिनी व गावकरी मंडळी यांचे मी स्वागत व अभिनंदन करतो
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे संचालन व आभार प्रदर्शन श्री अमोल झंपलवार रा. विठ्ठलवाडा यांनी केले धन्यवाद ओम नमःशिवाय जय शेषराव महाराज जय गूरुवर्य संतोषजी महाराज

श्री भाऊराव ठाकरे सर जिल्हाध्यक्ष राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा गडचिरोली