विलीनीकरण, सातवा वेतन आयोग आणि इतर काही मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. याबाबतची नोटीस एसटी महामंडळाला दिली आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले.
सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत नवीन समिती स्थापन करावी, त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात यावी, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या दोन प्रमुख मागण्या गुणरत्न सदावर्ते यांनी केल्या आहेत
