महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत पंचवार्षीक कृती आराखडा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये मुख्यतः गरीब कुटुंबांना वैयक्तिक लाभाच्या योजनाद्वारे गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मत्ता देऊन सुविधासंपन्न करून सर्वांगीण ग्राम समृद्धी करण्याच्या ध्यास रोहयो विभागाने घेतला आहे.
मनरेगा योजना राज्यामध्ये गतीने राबविण्यासाठी प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनाच्या कामांवर भर देण्यात येईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी सिंचन विहीरी, शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. तसेच फळबाग, वृक्ष लागवड, रेशीम (तूती) लागवड व बांबू लागवड या सारख्या कामांतून गरीब कुटुंबांसाठी स्थायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे.
मनरेगा योजनेअंतर्गत जास्ती जास्त नागरिकांनी सिंचन विहिरी व बागायत लागवडच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभरीत्या अर्ज करता यावा याकरिता मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण मा. मंत्री (रोहयो) श्री. संदिपान भुमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जास्तीत जास्त लोकांनी मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर व बागायत लागवडीसाठी अर्ज करण्याचे मा. मंत्री महोदयांनी नागरिकांना आवाहन केले आहे.