पशुसंवर्धन विभागातंर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी नविण्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे तसेच 100 कुक्कुट पिल्लाचे वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जाणार आहेत. संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करून पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.