ताज्या घडामोडी ताज्या बातम्या मुंबई राज्य विदर्भ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची IRCTC वेब साइटवर ऑनलाईन बस बुकिंग सेवा सुरु

एसटी महामंडळाने प्रवाशांना एक गुड न्यूज दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा आयआरसीटीसीने केली आहे. त्यामुळे आता IRCTC च्या वेबसाईटद्वारे एसटी बसचे तिकीट काढता येणार आहे. प्रवाशांना https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी IRCTC ने हा निर्णय घेतला आहे. तसेच IRCTC आणि एसटी महामंडळ यांच्यातील एकत्रीकरणामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.