ई-पीक पाहणी : शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, आपल्या पिकाची नोंद मागील वर्षापासून स्वतः मोबाईलवर करावी लागत आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी अँड्रॉइड Application सुद्धा विकसित करण्यात आलेला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची नोंद करण्यासाठी शासनाच्या ई-पीक पाहणी ॲपचा वापर करावा लागेल. त्यासाठी शासनामार्फत विविध मोहीमसुध्दा राबविण्यात आल्या असून, शेतकऱ्यांकडून मात्र, पीक पाहणी नोंदीसाठी अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. बहुतांश गावातील 30 ते 40 टक्के ई-पीक पाहणी नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यांनाच मिळणार अतिवृष्टी अनुदान
राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल महसूल व कृषी विभागात सादर करण्यात आला आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत संयुक्त पंचनामे चालू असून ते अंतिम टप्प्यात आहेत.
ई-पीक पाहणी ॲप Version 2.0 नवीन सुधारणासह, 10 वैशिष्टासह
शासनाकडून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्व निधी मिळणार आहे; मात्र हे अनुदान किंवा नुकसान भरपाई रक्कम अश्याच शेतकऱ्यांना दिली जाईल, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची नोंद ई पीक पाहणी अंतर्गत केली असेल. याबाबतचे स्पष्टीकरण बहुतांश जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
ई-पीक पाहणी शेवटची तारीख
ई-पिक पाहण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर असून, आता ई-पीक पाहणी म्हणजेच आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त सात दिवस शिलक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या शेतात जाऊन ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पिकाची नोंद करावी. ज्या शेतकऱ्यांनी पिकाची नोंद केले नसेल,अश्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पिक विमा इत्यादी योजनांचा लाभ दिला जाणार नाही.
पीक-पेरा कसा नोंदवाल ?
प्ले-स्टोरवरुन ई-पीक पाहणी ॲप व्हर्जन 2 डाऊनलोड करा. त्यानंतर ज्या शेतातील पिकांची नोंद करायची असेल, त्या शेतात जावा. त्यानंतर पिकात उभे राहून क्रमाक्रमाने विचारण्यात आलेली माहिती योग्यरीत्या भरा. तसेच आपल्या पिकाचा फोटो अपलोड करून ई-पीक पाहणी नोंदवा.