आज आपण एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे नेणाऱ्या (Abhay Yojana 2023) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ,काय आहे अभय योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Abhay Yojana 2023 महाराष्ट्र राज्य शासनाने वस्तू व सेवा कर विभागा अंतर्गत नवीन योजना जाहीर केली आहे. व्हॅट, बीएसटी, सीएसटी अशा कायद्यानंतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्याची ही सुवर्णसंधी आहे. 30 जून 2017 पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकी करिता अभय योजना ही लागू होणार आहे. वैधानिक आदर्श नुसार रुपये दोन लाख किंवा कमी असलेली थकबाकी निलंबित करण्यात येईल. रुपये दोन लाख पेक्षा जास्त थकबाकीसाठी विवादित करात 50 ते 70 टक्के तसेच व्याजात 85 ते 90% व शास्तीच्या 95 टक्के सवलत मिळणार आहे. रुपये 50 लाखापर्यंत थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना एकत्रित 20 टक्के रक्कम भरून थकबाकीतून मुक्त होण्याचा पर्याय आहे. तसेच रुपये 50 लाखांपेक्षा जास्त थक बाकीदारांसाठी हप्ते समितीचा पर्याय उपलब्ध आहे.