ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

दिव्यांगांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार

एटापल्ली तालुक्यात भव्य दिव्यांग मेळावा संपन्न

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचा मोलाचा वाटा

एटापल्ली:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवीवर्षानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड ॲक्शन (मित्र) फाउंडेशन तथा जिल्हा परिषद गडचिरोली (समाज कल्याण, आरोग्य आणि शिक्षण विभाग) तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे 10 मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरामध्ये माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्लीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन दिव्यांगांची सुश्रुषा केली. यामध्ये दिव्यांगांना रोड वरून विल चेअर मध्ये बसवून योग्य विभागाकडे नेणे, त्यांचे फॉर्म भरण्यात मदत करणे, कागदपत्र व्यवस्थित लावून देणे, दिव्यांगांना वाहनापर्यंत सोडून देणे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या नोंदी घेणे विविध कार्यात सहभागी होणे व मदत करण्याकरिता शिबिराला हातभार लावला.

एटापल्ली परिसरातील सर्व प्रकारातील दिव्यांगांना मदत व्हावी यासाठी गटविकास अधिकारी मुकेश मोहोर, मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजीत राऊत,वैद्यकीय अधीक्षक डॉ क्रांती राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ कन्नाके,तालुका कृषी अधिकारी पेंदाम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,गटनेता जितेंद्र टिकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष संभाजी हिचामी,जांभिया चे सरपंच राजू नरोटे, युवा नेते नंदू नरोटे, पिपलीचे सरपंच मुन्ना पुंगाटी, निलेश लेकामी राष्ट्रीवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव अभिनव नागुलवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पवन निलीवार,प्राध्यापक पुंगाटी, शिवाजी लेकामी, तसेच इतर विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी तथा आदी मान्यवर उपस्थित होते.

*शिबिरात 292 दिव्यांग बांधवांची तपासणी*
एटापली येथे आयोजित शिबिरात 246 दिव्यांग बांधवांची तपासणी करायची होती. मात्र, तालुक्यातील खेडापाड्यातून आलेल्या एकूण 292 दिव्यांग बांधवांची विविध तपासणी करण्यात आली. यामधील पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन व ऑनलाईन पोर्टल द्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र आणि शासनाच्या विविध योजनांची माहितीपत्रक स्पीड पोस्ट ने घरपोच देण्यात येणार आहे तसेच लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य, उपकरणे देण्यात येणार असल्याची माहिती मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी दिली आहे.