महाडीबीटी अंतर्गत विविध बाबींचा लाभ कशा प्रकारे शेतकऱ्यांना घेता येईल याबाबत कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
मुलचेरा:-
तालुक्यात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात 22 सप्टेंबर रोजी कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवाडा
कोपरोली माल ,नवीन लभांनतांडा, आंबेला येथे सभांचे आयोजन करण्यात आले.
या सभेत महाडीबीटी अंतर्गत विविध बाबींचा लाभ कशा प्रकारे शेतकऱ्यांना घेता येईल याबाबत कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी महाडीबीटी अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकरी भिमसिंग बानोद,सुनील बोडा यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपला अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगितले व आपण घेतला तशाप्रकारे इतर शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी कृषी विभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी महाडीबीटी बाबत व पी एम एफ ही सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले हा पंधरवडा 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे.