गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ग्रामीण भागात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन हे अभिमानास्पद:भाग्यश्रीताई आत्राम

*नृत्य स्पर्धेला रसिकांनी दिला भरभरून प्रतिसाद*
अहेरी:- शहरी भागात मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांचे आयोजन केले जातात. मात्र, ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा घेणे हे अभिमानास्पद असल्याचे मत माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी व्यक्त केले.रविवार (26 फेब्रुवारी) रोजी कमलापूर येथे अखिल नाट्य, क्रीडा, कला व सामाजिक संघटनेतर्फे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उदघाटन भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,रेपणपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजोग खरतड,माजी प स सदस्य मांतय्या आत्राम,कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत,माजी सरपंच राजनीता मडावी,उपसरपंच सचिन ओलेटीवार,जेष्ठ नागरिक रमनय्या ओलेटीवार,सेवानिवृत्त शिक्षक बापू चौधरी,सेवानिवृत्त वन अधिकारी दादाजी अडगोपुलवार, माजी उपसरपंच शंकर आत्राम,शंकर रंगुवार,भ्रष्टाचार निवारण जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार,अहेरीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने,कमलापूर ग्रामपंचायतचे सदस्य तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनस्पर्ष झालेल्या कमलापूर गावात मागील अनेक वर्षांपासून या संघटनेतर्फे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.मात्र,देशावर आलेल्या कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे कुठलेच कार्यक्रम घेता आले नाही.कोरोना नंतर या गावातील हा पहिलाच राज्यस्तरीय स्पर्धा असून या स्पर्धेची रसिकांना किती ओढ आहे, हे या ठिकाणी उसळलेल्या जनसागरावरून कळत आहे.नुकतेच विविध ठिकाणी नृत्यस्पर्धा,लावणी स्पर्धा घेण्यात आले.तसेच बऱ्याच ठिकाणी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. एवढेच नाहीतर इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असतानाही खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे,हेही कौतुकास्पद बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
*विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान*
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता दिवस रात्र काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका, वीज वितरण विभागात काम करणारे कर्मचारी तसेच परिसरातील ज्वलंत समस्या लेखणीतून मांडणाऱ्या पत्रकारांचा शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदीप रंगुवार तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश ढोबळे यांनी केले.यावेळी कमलापूर, कोडसेलगुडम,ताटीगुडम,छल्लेवाडा,रेपणपल्ली,मोदुमडगू,आशा,नैनेर,चिंतलगुडम आदी गावातील हजारो प्रेक्षक उपस्थित होते.