ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावी जागतिक मृदा दिनाचे आयोजन

मुलचेरा:-
तालुका कृषि अधिकारी कार्यालय च्या वतीने 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन गावोगावी घेन्याचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गद्शनाखाली मौजा कोळसापुर येथे कृषि सेवक मुंडे यांच्या नेतृतवाखालील जागतिक मृदा दिन आयोजन करण्यात आले.
यावेळी कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप केले व जमीन आरोग्य पत्रिकेचे वाचन कसे करावे आणि त्याचा शेतीवर अवलंब कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले माती नमुना कसा काढावा कुठला काढावा व कुठला काढू नये याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले व शेतकऱ्यांना माती नमुने तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले व जमिनीचे आरोग्य कसे जपता येईल याबाबत माहिती दिली यावेळी गावातील पोलीस पाटील गजानन शेडमाके व समस्त गावातील महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते