मुलचेरा-: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत उदयाला दिनांक 1 डिसेंबर 2023 ला जिल्हा प्रशासन गडचिरोली तालुका महसूल प्रशासन मुलचेरा यांचे वतीने आंबटपल्ली येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण मान्यवराकडून शिबिरस्थळी करण्यात येणार आहे. शिबिरस्थळी आरोग्य विभाग यांचे मार्फत स्टाल लावून रुग्णाची तपासणी तसेच मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती, उमेद, शिक्षण विभाग, वन विभाग, एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग अहेरी, एकात्मिक बालविकास विभाग, कृषी विभाग, बँक, संजय गांधी योजना विभाग, पुरवठा विभाग, निवडणूक विभाग, पशुसवर्धन विभाग यांचे मार्फतीने शिबिरस्थळी स्टाल लावून विविध योजनाची माहिती तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व अर्ज स्वीकारण्याचे काम करण्यात येणार आहे. तरी गोमनी , आंबटपाली, गोविंदपूर व सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील महिला व पुरुषांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हाण मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील, गोमनीचे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले आहे.
Related Articles
ताडगाव परिसरातील ज्वलंत समस्याचे विधानसभा विरोधी पक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार याना निवेदन
माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती अहेरी बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात दिले निवेदन गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाणारे भामरागड तालुक्यातील नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा ताडगाव येथील अनेक ज्वलंत समस्याचे निवेदन आज आविसं – काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्फतीने माजी कॅबिनेट […]
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण परीक्षा संपन्न
मुंबई, दि. ५ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा सन २०२३ करिता भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील विनामूल्य प्रवेश परीक्षा राज्यातील सात केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने यशस्वीरित्या झाल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालकांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (सीॲक) मुंबईचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, […]