ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

तालुका कृषी अधिकारी कार्यालय च्या वतीने भव्य शेतकरी चर्चासत्राचे आयोजन

मुलचेरा:-

संजीवनी फाउंडेशन तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने 20 डिसेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदरशनाखाली सहायक कृषी सेवक प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कृषी विभागाचे कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना माती नमुने काढणे, जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, सेंद्रिय कीटकनाशके तसेच महाडीबीटी पोर्टल, रोहियो अंतर्गत कामे, पी एम किसान सन्माननिधी व प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजना याविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी मोठ्या संख्यांनी महिला शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन कोपरअली येथील चर्च मधील सिस्टर लेसी जॉन यांनी केले होते यावेळी त्यांच्या संजीवनी फाउंडेशनचे समस्त सभासद उपस्थित होते तसेच कोपरल्ली चेक, आंबेला, लभानतांडा ,कोळसापुर, लोहारा ,रेंगेवाही ,देवदा येथील महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला व योजना विषयी आपल्या शंकांचे निरासन करून घेतले.