ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ऑस्कर्स स्पेशल: पडद्यामागील मेहनतीची गोष्ट नाटू नाटू’ गाणे,द एलिफंट व्हिस्परर्स’

नाटू नाटू’ गाणे:

‘RRR’ चित्रपटासाठी संगीतकार एमएम कीरवाणी यांनी 20 गाणी लिहिली होती, परंतु त्या 20 गाण्यांपैकी नाटू-नाटूला अंतिम स्वरूप देण्यात आले. 90% गाणे केवळ अर्ध्या दिवसात पूर्ण झाले. पण उर्वरित गाणे पूर्ण करण्यासाठी 19 महिने लागले. या गाण्याचे हुक स्टेप कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी 110 चालींमध्ये तयार केले होते. हेच कोरिओग्राफर प्रेम रक्षित एकेकाळी गरिबीला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी चेन्नईच्या मरीना बीचवर देखील गेले होते.

द एलिफंट व्हिस्परर्स’:

चित्रपटाची कथा दक्षिण भारतीय जोडपे बोमन आणि बेली यांची आहे, जे रघू नावाच्या अनाथ हत्तीची काळजी घेतात. ही डॉक्युमेंट्री 8 डिसेंबर 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली. केवळ 15 मिनिटांच्या या फिल्मची शूटिंग 5 वर्षे झाली आणि यादरम्यान फोन व कॅमेऱ्यात एकूण 450 तासांचे फुटेज कॅप्चर केले गेले आहे.