ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. ९ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्याने करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळेल जनतेने संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

मंत्री महोदय यांचे निवासस्थान सिंहगड येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, सहसचिव देवाप्पा गावडे, उपसचिव कैलास साळुंखे, सिद्धार्थ झाल्टे, कक्ष अधिकारी किशोर फुलझुले, संकेतस्थळ निर्मितीचे वरिष्ठ सल्लागार देविदास सुसे, विजयसिंह राजपूत, प्रल्हाद अनलम, साक्षी गोराड, सिल्वर टेक्नॉलॉजीचे शुभम राणे यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en हे संकेतस्थळ मराठी  व इंग्रजी दोन्ही भाषेतून उपलब्ध असून यामुळे जनतेला घरबसल्या सर्व माहिती मिळण्यास मदत होणार आहे. विभागानेही नव्याने होणाऱ्या निर्णयांची तसेच उपक्रमांची माहिती या संकेतस्थळावर अद्ययावत ठेवावी जेणेकरून जनतेला याचा लाभ घेता येईल.