गडचिरोली : इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी विद्यार्थी व पालकांमध्ये प्रमाणपत्र व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग लागली आहे. विशेष म्हणजे, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर तहसील कार्यालयात तसेच सेतू केंद्रात हेलपाटे मारत आहेत. इयत्ता दहावी बारावीनंतर विद्यार्थी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश घेतात. यासाठी त्यांना प्रमुख प्रमाणपत्रांची आवश्यकता असते.
जात प्रमाणपत्र
इयत्ता दहावी तसेच बारावीनंतर जात संवर्गातून विशिष्ट शैक्षणिक शाखेला प्रवेश मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ही आवश्यकता यासाठी स्थानिक स्तरावरून विविध दाखले गोळा करावे लागतात.
उत्पन्नाचा दाखला
शिष्यवृत्तीचा लाभ आर्थिक कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना मिळतो. यासाठी तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला आणावा लागतो. त्यानंतर तहसील कार्यालयातून पक्के प्रमाणपत्र संबंधिताना चार ते पाच दिवसात ऑनलाइन प्राप्त होते.
जात पडताळणी प्रमाणपत्र
जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र नोकरी,
निवडणूक व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनाच
प्राप्त होते. इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी कॉलेजमार्फत
काढली जाते.
रहिवासी दाखला
विद्यार्थी मूळ कोणत्या गावचा रहिवासी आहे.
यासाठी डोमिसाईल म्हणजेच रहिवासी
प्रमाणपत्र गरजेचे असते. जात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी जी आवश्यक असतात, तीच कागदपत्रे येथेही लागतात.