गडचिरोली ताज्या घडामोडी राज्य विदर्भ

प्रलंबित प्रश्न त्वरित सोडविले जाणार;आ.धर्मराव बाबा आत्राम यांची ग्वाही

बोलेपल्लीत संवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

मुलचेरा-आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघातील विविध गावात जाऊन जनतेसोबत संवाद साधण्यासाठी सुरू केलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा चौथ्या दिवशी परत मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे पोहोचली. या ठिकाणी गावातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात जनसंवाद यात्रेचे स्वागत केले. सुरुवातीला आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतली. काही समस्या तात्काळ सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. तर, प्रलंबित प्रश्न त्वरित सोडविले जाणार असल्याचे आश्वासित केले.

यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा सचिव संजय कोचे,जिल्हा उपाध्यक्ष फहीम काझी,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,माजी जि प अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे,माजी बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलचेरा तालुकाध्यक्ष युधिष्ठीर बिश्वास,सरपंच गणेश हलामी,उपसरपंच वैशाली दुर्गे, मारोती पल्लो,मिलिंद दुर्गे,सदस्य सीताराम पल्लो,प्रकाश रापंजी, साधना कुळयेटी, भूमिया मस्तरी झोरे,गाव पाटील मनोहर तिम्मा,ग्रामसभा अध्यक्ष रमेश तिम्मा,फकिराजी धुर्वा, पत्रु कुळयेटी, ग्रामसभा सदस्य देवदा प्रमोद कोडापे,मालू मट्टामी, कोत्तु नरोटे अडेंगेपल्ली,बाजीराव वेलादी,सूर्यप्रकाश चांदेकर बोलेपल्ली, देवदा, पुल्लीगुडम,अडेंगेपल्ली,वेंगनूर, पळकोटोला,सुरगाव,हेटळकसा आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना मागील दहा वर्षे आमदार नसतानाही बोलेपल्ली परिसरातील बहुतांश गावातील नागरिकांशी आपला संपर्क होता.हा माझ्या आदिवासी बांधवांचा गाव असून नेहमीच माझ्या पाठीशी आहे.तालुका निर्मिती नंतर या परिसरात बरेच विकासकामे झाली आणि काही छोटेमोठे कामे शिल्लक असतील ते ही पूर्ण करू. यापूर्वीच पुल्लीगुडम गावातील नागरिकांनी रस्त्याची मागणी केली होती. बोलेपल्ली ते पुलीगुडम रस्त्याच्या कामाला प्रयत्नही झाले होते. मात्र, वनविभागाच्या अडकाटीपणामुळे हे काम होऊ शकले नाही.मात्र, चंदनवेली ते पुल्लीगुडम या रस्त्याचा कामाला आपण सुरुवात केली. पावसामुळे काम थांबले असलेतरी येत्या काही दिवसात ते काम पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मिळालेल्या संधीचा फायदा घ्या; भाग्यश्रीताई आत्राम
संवाद यात्रेदरम्यान परिसरातील काही नागरिकांनी जमिनीच्या पट्टेसंदर्भात भाग्यश्री ताई आत्राम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी ताईंनी बहुतांश ठिकाणी वन हक्क पट्टे संदर्भात काम सुरू असून मुलचेरा तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा पुढे येण्याची गरज आहे.मी स्वतः पुढाकार घेऊन हे काम हाती घेतली आहे. त्यामुळे वनहक्क पट्टे असो किंव्हा इतर कुठलाही विषय असेल आपल्यापर्यंत चालून आलेली ही संधी समजून त्याचा फायदा घेण्याचे आवाहन भाग्यश्रीताई आश्रम यांनी केले.