विविध सामाजिक उपक्रमांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील अनेक गावांत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस साजरा झाला..!!
गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष,लोकनेते,अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस असल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी जणू काही एक उत्सवाचा हा दिवस असतो.
राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आजच्या युवा पिढीचे आदर्श आहेत,तरुणाई च्या गळ्यातील ताईत आहेत, शांत संयमी स्वभाव,त्यांची कार्यशैली,दानशूर वृत्ती, त्यांच्यात असलेली आपुलकीची प्रत्येकासाठी असलेली भावना, विकासात्मक दूरदृष्टी आणि प्रत्येक कार्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांच्यातील गुण आज प्रत्येक कार्यकर्ते यांच्यासाठी आकर्षनाचं केंद्र बिंदू ठरत आहेत.
आज अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचा वलय त्यांच्या भोवती निष्ठेने वावरताना दिसतो.
आज आपल्या लाडक्या लोकनेत्याच्या वाढदिवसा निमित्ताने अहेरी विधानसभा क्षेत्रातील मूलचेरा, अहेरी, सिरोंच्या, एटापल्ली, भामरागड अशा पाच ही तालुक्यातील अनेक गावामध्ये कार्यकर्ते यांनी
केक कापून,रक्तदान शिबिर,मॅरेथॉन स्पर्धा, अन्नदान, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप, छात्रावास येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंना कपडे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष,लोकनेते,अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच ही तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षांव त्यांच्यावर करण्यात आला.
यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील , मूलचेरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंच्या,अहेरी येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी,गावकरी,महिला वर्ग आणि तरुण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता..!