गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

पेरमिली येते जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम साजरा : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते उदघाटन

दिनांक 08/03/2023 रोज बुधवार ला पेरमिली येथील पटवारी भवनात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बचत गट महिला प्रभाग संघ पेरमिली यांच्या मार्फतीने जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष( Ajaykankdalwar )श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमालाउमेद गटाचे 170 महिलां बचत गट उपस्थित होते, महिला दिनानिमित्त गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात यावेळी करण्यात आले असून महिलांवरील अन्याय अत्याचार,याबाबत तसेचमहिलांच्या विविध अडचणी,काम करत असताना होणाऱ्या समस्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले..!!

यावेळी मंचावर उपस्थित पेरमिलीचे सरपंचा सौ.किरणताई नैताम,मेडपलीचे सरपंच श्री.निलेश वेलादी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अधिकारी अध्यक्ष,उपाध्यक्ष, संच प्रमुख तसेच 170 महिला बचत गटांचे पदादीकारी व महिला सदस्य उपस्थिती होते..!!