गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पेरमिली येते पारंपरिक दसरा उत्सवात राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते पूजन, ५१ गावांतील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती..!! आदिवासी समाज संघटित होणे काळाची गरज.. राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादन..!!

पेरमिली येते पारंपरिक दसरा उत्सवात राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते पूजन, ५१ गावांतील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती..!!

आदिवासी समाज संघटित होणे काळाची गरज.. राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादन..!!

शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या अहेरीचा दसरा झाल्यावर येथील ज्योत नेऊन अहेरी इस्टेटमधील अनेक आदिवासी पट्टीत आदिवासी बांधव दसरा उत्सव साजरा करतात, त्याच परंपरेप्रमाणे अहेरी तालुक्यातील पेरमिली येते अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हस्ते विधीवत पूजन करून मोठ्या उत्साहात आदिवासी बांधवांनी काल दसरा साजरा केला, ह्यावेळी पेरमिली पट्टीतील ५१ गावांतील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..!!

आदिवासी बांधवांना संबोधित करतांना राजे मनाले आदिवासी समाज हा ह्या देशातील मुळ निवासी आहे आपल्या क्षेत्रातील जल, जंगल, जमीनीवर त्यांचा पहिला अधिकार आहे त्यामुळे आदिवासी समाजाने आपसातील मतभेद दूर करून एकत्रित येणे ही काळाची गरज आहे असे झाल्यास आपल्या समाजाचा प्रगती कोणीही रोखू शकनार नाही असे प्रतिपादन राजेंनी ह्यावेळी केले तसेच आपल्या क्षेत्राचा विकासासाठी मी कटिबद्ध आहे कोणालाही काहीही समस्या असेल त्यांनी निःसंकोच माझ्याकडे ह्यावे सर्वांचे समाधान करणे ही ह्या इस्टेटचा राजा मनून माझी जबाबदारी आहे असेही पुढे राजे बोलले..!!
रात्री आदिवासी पारंपरिक नृत्य तथा गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसेच राजेंचा मार्गदर्शनाने परंपरागत दसरा उत्सवाचा समारोप झाला, ह्यावेळी पेरमिली पट्टीतील शेंड्या, गाव पटेल, गाव भूमिया ह्या सह परिसरातील ५१ गावांतील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..!!