महाराष्ट्र रोजगार हमी योजना अधिनियमाचे अंमलबजावणी 1977 पासून महाराष्ट्रात सुरु झाली . प्रथमच या अधिनियमानुसार महाराष्ट्रामध्ये दोन योजना सुरू होत्या.
ग्रामीण भागात कुशल व्यक्तींना रोजगार हमी योजना
अधिनियम 1977 कलम 12(ई) नुसार वैयक्तिक लाभ योजना
या योजनेअंतर्गत अनेक अनुदान ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दिले जाते तसेच अकुशल कामगारांना 100 दिवस काम दिले जाते महात्मा गांधी रोजगार हमी मध्ये कृषी विभागात शेतकऱ्यांना आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावे तसेच शेतकरी वर्ग मुख्य प्रवाहामध्ये यावे या दृष्टीने विचार करून शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर ही फळ लागवड करण्यासाठी अनुदान दिले जाते. तर आज आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र(MGNREGS) या रोहयोतर्गत फळबाग लागवड योजना बदल जी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Bandhavaril Falbag Lagvad (MGNREGS)
फळबाग लागवड:-
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या बांधावर फळ झाडे लावू शकतो त्याच बरोबर शेती पीक घेऊन जर जमीन शिल्लक असेल त्या ठिकाणी सलग पद्धतीचे फळलागवड शेतकरी करू शकतो शेतकऱ्यांना या दोन्ही पद्धतीने फळ लागवड करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना:
1) सलग फळबाग लागवड
2) बांधावरील फळबाग लागवड
3) गांडूळ खत युनिट
अटी व कागदपत्रे :
1) शेत जमीन 2.00 हेक्टर आर पेक्षा कमी असावे
2)7/12 उतारा
3)८ अ
४) बँक पासबुक
५) जॉब कार्ड