ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नवीन योजनेची घोषणा पहिल्या टप्प्यात १ लाख दुसऱ्या टप्प्यात २ लाख केवळ पाच टक्के व्याजाने मिळणार कर्ज

विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली आहे. या योजनेला मंजुरी देखील देण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांना योजनेद्वारे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी केवळ ५ टक्के एवढा व्याजदर असणार आहे.

या योजना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत कोणाला होणार फायदा

जे तरूण चर्मकार आहेत, गवंडी, सोनार, शिंपी, सुतार, शिल्पकार, जाळी तयार करणारे, कुंभार, टेलर, लोहार यांना विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. केवळ यांनाच नव्हे तर या व्यतिरिक्त एकूण 18 पारंपरिक कामे करण्यासाठी हि विश्वकर्मा योजना आणण्यात आली आहे.

एकूण तीस लाख कुटुंबांना या विश्वकर्मा योजनेद्वारे थेट लाभ होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. हि योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी बेसिक आणि ॲडव्हान्स अशा दोन प्रकारचे ट्रेनिंग लाभार्थींना दिले जाणार आहे.

त्यामुळे जे तरुण बेरोजगार आहेत अशा तरुणांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी आहे. सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढत चालले आहेत.

अशा परिस्थितीमध्ये हि विश्वकर्मा योजना अशा लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदतगार ठरू शकते.

या संदर्भात ट्वीटर माहिती देखील देण्यात आली आहे.