ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

PM विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्ज सुरु

केंद्रशासनाकडून भारतातील विविध समाजासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये अल्पसंख्यांक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, इत्यादी विविध वर्गांचा समावेश आहे. चालू वर्षातील भारताच्या अर्थसंकल्पामध्ये अशाच एका समाजासाठी एक नवीन योजना घोषित करण्यात आलेली आहे. या योजनेचं नाव म्हणजे PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना होय.

PM Vishwakarma Yojana

भारताचा अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामार्फत विविध अशा महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याची एक महत्वपूर्ण घोषणा देखील करण्यात आलेली होती. शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठीच्या या कल्याणकारी योजनेला पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना असं नाव देण्यात आलं आहे. विश्वकर्मा समाजाअंतर्गत मोडणाऱ्या जवळपास 140 जातींचा समावेश सदर योजनेत करण्यात आलेला असून या जातींना योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

 

15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्यामार्फत लाल किल्ल्यावर देशाला संबंधित करताना कारागिरांसाठीची विश्वकर्मा योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा उद्देश देशभरातील कारागीर आणि शिल्पकारांची कौशल्य क्षमता वाढवणे आहे. शासन सुरुवातीला या योजनेसाठी 13,000 कोटी रुपयापासून ते 15,000 कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करणार आहे. ज्यामध्ये कौशल प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य इत्यादींचा समावेश असेल.

योजना नाव PM Vishwakarma Yojana
घोषणा कोणी केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन
कोणी सुरु केली केंद्रशासनद्वारा
कॅटेगरी आत्मनिर्भर भारत
लाभार्थी वर्ग विश्वकर्मा समाजातील जाती
उद्देश व्यवसाय मार्गदर्शन, आर्थिक मदत
एकूण निधी 13,000 ते 15,000 करोड रु.
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

विश्वकर्मा योजना महाराष्ट्र

PM विश्वकर्मा श्रम सन्मान योजना देशातील इतर राज्यासह महाराष्ट्र राज्यासाठीसुद्धा लागू असेल; कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला विश्वकर्मा समाजातील कारागीर आढळून येतात, ज्यामध्ये सुतार, नाविक, लोहार, सोनार, कुंभार, शिंपी, धोबी इत्यादी विविध क्षेत्रातील कारागिरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कामगारांसाठी ही योजना उपलब्ध असल्यामुळे आम्ही विश्वकर्मा योजना मराठी भाषेमध्ये माहिती उपलब्ध करून देत आहोत.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना लाभ कोणाला मिळणार ? (Benefits)

  • सुतार
  • नाविक
  • लोहार
  • कुलुपांचे कारागीर
  • सोनार
  • कुंभार
  • लोहार
  • मूर्तिकार
  • मोची
  • टेलर
  • धोबी
  • मच्छीमार
  • हातोडा इत्यादी कीट बनविणारे कारागीर
  • चटई, झाडू बनविणारे कारागीर
  • लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर
  • वारीक म्हणजेच सलूनमध्ये काम करणारे कारागीर

कौशल विकास अभ्यासक्रम

पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कामगारांना जास्तीत जास्त कौशल्य कशी विकसित करता येतील, यावरती मुख्यत्व भर दिला जाईल. त्याचप्रमाणे कामगारांना आधुनिक उपकरण व डिझाईनची माहिती देण्यात येईल आणि पारंपारिक कामगारांना आधुनिक यंत्र, उपकरण खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. Vishwakarma Yojana च्या माध्यमातून कामगारांना सामान्यतः दोन प्रकारच कौशल्य विकास अभ्यासक्रम घेण्यात येईल. मूलभूत आणि प्रगत, कोर्स करणाऱ्या कामगारांना स्टायफंड म्हणून प्रतिदिन 500 रुपयेसुध्दा देण्यात येतील.

PM विश्वकर्मा योजना कागदपत्रे (Documents)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक

योजना कधी सुरु होणार ?

पीएम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र 2023 ही पुढील महिन्यातील 17 तारखेला सुरू होईल, म्हणजेच 17 सप्टेंबर 2023 दिवशी देवांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त अवचित साधून या योजनेचा शुभारंभ करण्यात येईल. कारागीर आणि लहान व्यवसायिकांना या योजनेचा मोठा फायदा होईल. पारंपारिक व्यवसाय करत असलेल्या कामगाराकडे कौशल्य असेल आणि त्यांच्याकडे भांडवल नसेल, तर अशा परिस्थितीत त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

PM विश्वकर्मा Scheme Launched

काल दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत PM विश्वकर्मा योजनेची सुरुवात करण्यात आली. आता इच्छुक व पात्र विश्वकर्मा समाजातील कामगारांना आपल्या व्यवसायासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून कर्ज मिळवता येणार आहे. ऑनलाईन अर्जाची वेबसाईट व अर्ज प्रक्रिया या लेखांमध्ये शेवटी देण्यात आलेली आहे.

PM विश्वकर्मा योजना Last Date

PM विश्वकर्मा श्रम सन्मान योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली असल्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किंवा मुदत अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. योजनेसाठी ठरवण्यात आलेली व्याप्ती निधी 13,000 ते 15,000 करोड रु. असून हा निधी वाटप जवळजवळ आल्यानंतर शेवटची मुदत देण्यात येईल, असा अंदाज आहे.

आर्थिक मदत किती मिळणार ?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये अर्जदार लाभार्थ्यांना 1 लाखापर्यंत कर्ज दिलं जाईल. यावरील व्याजदर कमाल 5 टक्के असेल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कामगारांना वाढीव 2 लाखापर्यंत सवलतीच कर्ज देण्यात येईल. कर्ज परतफेड केल्यानंतर कामगारांना पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र बहाल करण्यात येईल. सर्व गोष्टीसह थोडीफार मदत म्हणून कामगारांना आधुनिक उपकरण खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयांची आर्थिक मदतसुध्दा केली जाईल.

Vishwakarma Yojana Website

विश्वकर्मा योजनेची सद्यस्थितीत फक्त अंमलबजावणी किंवा घोषणा करण्यात आलेली असल्यामुळे अद्याप यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत (Official) वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. 17 सप्टेंबर 2023 दिवशी ही योजना सुरू करण्यात आल्यानंतर सलग्न योजनेचा अधिकृत संकेतस्थळसुद्धा शासनाकडून जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही चुकीच्या अथवा बोगस वेबसाईटवर नोंदणी किंवा चौकशी करू नये.

अर्ज कसा करावा ? (Online Application Process)

PM विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन Registration प्रक्रिया सुरू झालेली असून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना, कामगारांना गावातील सामायिक सेवा केंद्रात नोंदणी करावी लागेल, त्यानंतर कामगारांची पात्रतेनुसार तीन स्तरानंतर अंतिम निवड करण्यात येईल. पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यपद्धतीत राज्यसरकार मदत करेल; परंतु यासाठीचा संपूर्णता खर्च केंद्र शासनाकडून करण्यात येईल.

PM विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

पीएम विश्वकर्मा योजना कोणी सुरू केली ?

भारताचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामार्फत केंद्र सरकारची पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना सुरू करण्यात आली.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा ?

अर्जाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही; त्यामुळे अर्ज प्रक्रिया लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ विश्वकर्मा समाजातील तब्बल 140 जातींना मिळणार आहे.