PMFME Scheme : शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच जोडधंदा म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची व उद्योगधंद्याची ध्यास धरणे काळाची गरज होत चालली आहे. शेतीसोबत शेतकऱ्यांना जोडधंदा करता यावा, यासाठी केंद्र शासनामार्फत पंतप्रधान सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग योजना अमलात आणण्यात आली आहे. ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल दहा लाखापर्यंत अनुदान (Subsidy) दिलं जातं.
शेतकरी, व्यवसायिक वर्ग (Business Category) यांच्यामार्फत अन्नपिकांवर प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के आणि जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत अनुदान (Subsidy) या योजनेअंतर्गत देय आहे. मुख्यत्वे शेतकऱ्यांना उद्योजक (entrepreneur) बनविण्यासाठी ही योजना केंद्रशासनामार्फत सुरू करण्यात आली.
PMFME Scheme ( प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना )
केंद्रशासनामार्फत विविध स्वरूपातील उद्योगांसाठी खूप योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना. केंद्रशासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत ही योजना सुरू केली आहे.
योजनेचे नाव | पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना |
लाभार्थी वर्ग | शेतकरी, व्यवसायीक, बेरोजगार इत्यादी |
एकूण लाभ रक्कम | प्रकल्प खर्चाच्या ३५ % किंवा १० लाखापर्येंत |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Login |
अर्ज कोणाला करता येईल ?
पीएमएफएमई या केंद्रशासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी जे शेतकरी उद्योजक (entrepreneur) होण्यास इच्छुक असतील, असे सर्व शेतकरी पात्र आहेत. सोबतच वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, गट लाभार्थी इत्यादी व्यक्तीसुद्धा अर्ज करू शकतात
कोणत्या उद्योगासाठी अर्ज करता येईल ?
PMFME Scheme योजनेच्या सुरुवातीला जिल्ह्याची निवड ठराविक उद्योगासाठी करण्यात आली होती; परंतु कालांतराने शासनाने ही अट रद्द केली असून, शेतकऱ्यांना आता कोणत्याही पिकावर अथवा फळावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करता येणार आहे. ज्यामध्ये खालील फळांचा किंवा पिकांचा व इतर घटकांचा समावेश असेल.
- डाळिंब
- ऊस
- टोमॅटो
- दूध व दुग्धजन्य पदार्थ
- धान्य
- भाजीपाला
PMFME अटी व शर्ती
- अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा.
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे.
- या योजनेअंतर्गत शिक्षणाची कोणत्याही प्रकारची अट नाही.
- एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
- पात्र प्रकल्प किमतीच्या किमान दहा टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी अर्जदाराची असावी लागते.
- उद्योगांमध्ये दहापेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.