मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कवी व लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण प्रसारित होणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कवी व लेखक प्रशांत डिंगणकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून कवितांचे सादरीकरण केले आहे. यावेळी सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी श्री. डिंगणकर यांचा परिचय करुन दिला.