ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर ऑनलाइन अर्ज सुरु

शेतकरी बंधुनो आपल्यासाठी खास योजना आपल्याला जर पॉवर टिलर (Power Tiller) घ्यायचाय तर चिंता करू नका. कारण पॉवर टिलर (Power Tiller) घेण्यासाठी शासन देताय ८५ हजार पर्यंत अनुदान. यालेखात तुम्हाला आम्ही योजनेबद्दल माहिती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता, अनुदान या बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

Power Tiller

    शेती म्हंटल कि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि  हीच शेतकऱ्यांची ओळख, शेतीच्या कामासाठी मशागती साठी औजारे हा महत्वाचा घटक. यामध्ये शेतीच्या कामासाठी  विवध औजारांचा समावेश होतो. ट्रँक्टर, पेरणी यंत्र, पॉवर टिलर, नांगर, रोटाव्हेटर, वखर, सारा यंत्र इ. अशा विविध औजारांचा शेतीच्या मशागतीसाठी उपयोग होतो.
    पॉवर टिलर (Power Tiller) प्रामुख्याने उस चाळणी / बांधणे यासाठी उपयोग होतो. बरेच शेतकरी आता शेतात ऊस पिक घेतात. आणि यासाठी चाळणी/बांधणी बैलाच्या सहाय्याने/पॉवर टिलर च्या सहाय्याने करतात.
    पॉवर टिलर ट्रँक्टरपेक्षा लहान असल्यामुळे ऊस बांधणीकरिता त्याचा जास्त प्रमाणात वापर होतो. यामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचत होते. परंतु पॉवर टिलर (Power Tiller) यंत्राची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना घेण्यासाठी जास्त खर्च येतो. शासन शेतीशी निगडीत विविध योजना अनुदानावर राबवित असते. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान अंतर्गत शेतीच्या सर्व यंत्र व औजारे यासाठी अनुदान दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे / माहिती

  • आधार कार्ड झेरॉक्स.
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • ७/१२, ८अ उतारा.
  • मोबाईल नंबर.
  • अनु.जा./अनु.ज असल्यास जात प्रमाणपत्र.

अटी व शर्ती

  • लाभार्थी शेतकरी असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्याच्या नावे ७/१२, ८ अ उतारा असणे बंधनकारक आहे

Power Tiller Subsidy : पॉवर टिलर अनुदान

क्षमता ८ बी एचपी पेक्षा कमी असेल 

  • अनुसूचित जाती & अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला शेतकरी (Power Tiller Subsidy)  : ६५,०००/- रु.
  • इतर लाभार्थीसाठी (Power Tiller Subsidy) : ५०,०००/- रु.

क्षमता ८ बी एचपी व त्यापेक्षा जास्त असेल तर :

  • अनुसूचित जाती & अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला शेतकरी (Power Tiller Subsidy)  : ८५,०००/- रु.
  • इतर लाभार्थीसाठी (Power Tiller Subsidy)  : ७०,०००/- रु.