तुम्हाला माहिती असेल, मातृवंदना योजनेअंतर्गत याआधी पहिले अपत्य मुलगी असल्यावर सरकारकडून 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती.
मात्र आता सरकारने दुसरे अपत्य देखील मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पंतप्रधान मातृवंदना योजना – 2 लागू करण्याची घोषणा केली आहे.
पहा कुणाला मिळेल या योजनेचा लाभ
ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे तसेच किमान 18 वर्षे व कमाल 55 वर्षे वय असलेल्या महिलांसाठी ही योजना असेल.
दुसरे अपत्य जुळे झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तरी एकाच मुलीसाठी लाभ दिला जाईल.