मुलचेरा :- ०६/०५/२०२५ रोजी तालुकास्तरीय खरिप हंगामपुर्व शेतकरी कार्यशाळा तहशील सभागृह मूलचेरा येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये खालील प्रमाणे मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. गटांच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक निविष्ठा एकत्रित खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात बचत होऊन उत्पादन खर्च कमी होणार आहे विद्यापीठाचे तंत्रज्ञान व नैसर्गिक शेती तसेच सेंद्रिय शेती अवलंब करणे कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली एफपीओ स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माननीय तालुका कृषी अधिकारी कु. सोनाली सुतार मॅडम तसेच भात आणि कापूस पिकावरील लागवड तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रितम चिरडे सर तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे, कृषी अधिकारी लोलमवाड सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूलचेरा येथील कृषी पर्यवेक्षक श्री. गरमळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक श्री. हारगुळे सर यांनी केले , तसेच कृषी विभागातील कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
