गडचिरोली: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 10 ते 20 फेबुवारी 2023 दरम्यान चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्या हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सामुदायिक औषधोपचार मोहीम आरोग्य कर्मचार्यांमार्फत खाऊ घालण्यात येत आहे. वरील दोन्ही तालुके हत्तीरोग जोखीमग्रस्त असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविली जात आहे. 100 टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालण्याच्या दृष्टीकोनातून आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी टीम द्वारे दिवस पाळीत किवा रात्रो पाळीत जेवण झाल्यानंतर शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, अंगणवाडी व कार्यालये इत्यादी ठिकाणी बूथ चे नियोजन व गावोगावी गृहभेटी द्वारे गोळ्या खाऊ घालण्यात येत आहे. सामुदायिक औषधोपचार मोहीमेत आत्तापर्यंत वरील दोन तालुक्यात 83.32 टक्के लोकांनी गोळ्या सेवन केल्या आहेत. स्वत: जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य कर्मचार्यांना सर्व नागरिकास गोळ्या खाण्याचे आवाहन केले आहे. गोळ्या सुरक्षित असून ते सेवन करणे हा हत्तीरोग संसर्ग रोखण्याचा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी कळविले आहे. हत्तीरोग दूरीकरणाकरिता चामोर्शी व आरमोरी तालुक्यात 10 ते 20 फेबुवारी या कालावधीत 3 दिवस शाशकीय सुट्या आल्याने गोळ्या खाऊ घालण्याचे उदिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही त्यामुळे सदर मोहिमेचा कालावधी दिनांक 25 फेबुवारी 2023 पर्यंत वाढवून 100 टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालून उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना मा. सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी दिलेले आहे वरील दोन्ही तालुक्यातील ज्या लोकांनी गोळ्या सेवन केले नाहीत त्यांनी या मोहीम कालावधीत गोळ्या सेवन करावे व हतीरोगाचे उच्चाटन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले आहे.
Related Articles
माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी घेतला राधाकृष्ण कीर्तनाचा आणि रासलीला उत्सवाचा आनंद
हजारो गावकर्यांची उपस्थिती मूलचेरा:- स्थानिक मूलचेरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि बंगाली बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या सुंदरनगर ग्रामपंचायत येथे तुळशी विवाहाच्या पावन पर्वावर स्थानिक राधाकृष्ण मंदिर मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राधाकृष्ण कीर्तनाचा आयोजन स्थानिक गावकऱ्यांनी केला होता, त्या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी भेट […]
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.७: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी […]
(Punjab And Sind Bank) पंजाब & सिंध बँकेत 183 जागांसाठी भरती
Punjab & Sind Bank is a government-owned bank, with headquarters in New Delhi. Of its 1559 branches spread throughout India, 623 branches are in Punjab state. Punjab and Sind Bank Recruitment 2023 (Punjab and Sind Bank Bharti 2023) for 183 Specialist Officers in JMGS-I, MMGS-II, and MMGS-III. Posts. Total: 183 जागा पदाचे नाव & तपशील: पद […]