देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या हितार्थ 16 फेब्रुवारी 2016 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. योजना चालू झाल्यापासून एकूण 36 कोटी शेतकरी या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत व जवळपास 1 लाख कोटी रु. पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्याबदल भरपाई देण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये एक महत्त्वपूर्ण मोहीम केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केली. शेतकऱ्यांसाठीची ती मोहीम म्हणजे ” माझी पॉलिसी माझ्या हातात ! “
पिकविम्याच्या या देशव्यापी मोहिमेची सुरुवात इंदुरपासून 35 किलोमीटर दूर असलेल्या बुढी बरलाई या छोट्याशा गावातून करण्यात आली. ” माझी पॉलिसी माझ्या हातात “ या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला आहे अश्या शेतकऱ्यांना घरपोच त्यांच्या विम्याचे कागदपत्रं ( Crop Insurance Documents ) पोहचविणे.
36 कोटी शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिकाच्या विविध नुकसानीसाठी नुकसान भरपाई दिली जाते. ज्यामध्ये पुढील बाबीचा समावेश आहे. दुष्काळ, वादळ, अवकाळी पाऊस, पूर, भुसंख्लन, गारपीट, कीटकांचा प्रादुर्भाव, चक्रीवादळ इत्यादी.
पेरणीपासून कापणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकावर संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जाते. आतापर्यंत जवळपास 36 कोटी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे.
मोहीम तब्बल महिनाभर चालणार
” माझी पॉलिसी माझ्या हातात “ ही मोहीम तब्बल महिनाभर चालणार आहे. मोहिमेअंतर्गत रब्बी हंगाम 2021-22 यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवलेला असेल अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन पिक विम्याची कागदपत्रे दिली जाणार आहेत.
सोबतच या मोहिमेच्या माध्यमातून नैसर्गिक शेती, ड्रोनचे शेती व्यवसायातील उपयोग, e-sampling यासारख्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा परिचयसुध्दा शेतकऱ्यांना करुन दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजना, सरकारची धोरणे, जमिनीच्या नोंदी, दावा पद्धत व PMFBY ( Pradhan Mantri Fasal Bima Yojana ) यासारख्या सर्व गोष्टी अवगत झाल्या आहेत का ? ते मोहिमेच्या माध्यमांतून पडताळून पाहणे.
पीक विमा ( Crop Insurance ) मध्ये सहभाग कसा घ्यायचा ?
शेतकरी खालील 3 पद्धतीने आपल्या शेतातील पिकाचा विमा उतरवू शकतात; म्हणजेच पीक विमामध्ये सहभाग नोंदवू शकतात.
- बँकेमध्ये
- Crop Insurance android ॲपच्या मदतीने
- जवळच्या CSC ( सीएससी ) केंद्रामध्ये
पीकविमा ( Crop Insurance ) योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- 7/12 व 8अ उतारा ( Land Record )
- बँक पासबुक झेरॉक्स ( Bank Passbook )
- पीकपेरा ( Sowing Certificate )
- पीकविमा फॉर्म ( Crop Insurance Form )
- आधारकार्ड ( Aadhar Card )
माझी पॉलिसी माझ्या हातात काय उपक्रम आहे ?
शेतकऱ्यांना घरबसल्या पिक विम्याची पावती मिळावी या अनुषंगाने चालू करण्यात आलेला शासनाचा हा नवीन उपक्रम आहे.
“माझी पॉलिसी माझ्या हातात” योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल का ?
नक्कीच, कारण बरेच शेतकरी दुर्गम भागात राहतात. अशा शेतकऱ्यांना घरपोच विमा पावती दिल्यास त्यांना सोयीस्कर होईल.