ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

मुलचेरा :-

          आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा जि गडचिरोली येथील कार्यरत प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड  आदर्श शिक्षक पुरस्कार राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय मौदा येथील झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रदान करण्यात आला .गडचिरोली सारख्या दुर्गम भागात शैक्षणिक, संशोधन आणि इतर सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. माननीय बबलू भैया हकीम आणि सौ शाईन हकीम यांनी मला हे कार्य करण्यासाठी प्रेरित केले त्याबद्दल मी त्यांचे फार आभारी आहे . तसेच या पुरस्काराचे श्रेय प्राचार्य डॉ रणजीत मंडल आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनां दिले.याप्रसंगी महाविध्यालयात सत्कार करण्यात आला