ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत आदिवासी शेतकरी बांधवाकरिता विवीध योजना

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत केंद्रवर्त्ती अर्थसंकल्प योजना सन 2022-23 अंतर्गत अहेरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अहेरी / मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवाकरिता खालील योजना मंजूर आहे. तेव्हा ईच्छूक आदिवासी शेतकरी बांधवाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 योजनाचे अर्ज या कार्यालयालातून विनामूल्य घेऊन जावे व 10 दिवासाच्या आत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरुन अर्ज या कार्यालयास सादर करावा.

1. एकूण 24 आदिवासी शेतकरी बांधवाकरिता सेंद्रिय खत निर्मिती करिता वर्मी कंपोस्ट बेड पुरविणेकरिता 85 व 100 टक्के अनुदानावर आर्थिक मदत देणे.

योजनेची एकूण रक्कम : – 360000/-

प्रति लाभार्थी मंजूर रक्कम माडिया :- 15000/-

प्रति लाभार्थी मंजूर रक्कम बिगर माडिया :-12750 /-

टिप :- या योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे

1.जातीचा दाखला 2.ग्रामसभा ठराव 3. बँक पासबुक प्रत आधार लिंक असणे आवश्यक 4. सात बारा दाखला 5.योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र 6.आधार कार्ड 7. राशन कार्ड 8.उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदार यांचे इ.कागदपत्र अर्जासोबत जोडने आवश्यक

वरील प्रमाने या योजनेचा जास्तीत जास्त आदिवासी शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आव्हाण वैभव वाघमारे,भा.प्र.से. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

अहेरी जि.गडचिरोली. यांनी करत आहे.