छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमान जनक व वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुलचेरा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपाल हे संविधानिक व घटनात्मक पद असताना देखील राज्यपालाकडून छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले व राज्यातील इतरही महापुरुषांच्या विषयी नेहमी अपवादग्रस्त विधान केल्या जाते हे अतिशय निंदनीय असून भाजप नेते व सरकार मधील लोक त्यांना पाठीशी घालतात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांविषयी अपवादग्रस्त विधान केले.याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शाह, तालुका काँग्रसचे अध्यक्ष प्रमोद गोटेवार,महिला अध्यक्ष सुवर्णताई येमुलवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम शेंडे, तालुका उपाध्यक्ष सुसेन हलदार,युवक काँग्रेसचे सहसचिव निलेश ओलालवार, विनोद बानोत, वसंत बोडा,बाळु येलमुले, प्रतीक मडावी, सुधाकर गोटेवार ,अमर कोंड्रावार,ऋषी येलमुले,नयन तूनकलवार व आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
