एकूण 3 आदिवासी महिला बचत गटांना मोहफुल / आंबाडीपासून ज्यूस, लाडू, तयार करण्याकरिता 85 व 100 टक्के अनुदानावर आर्थिक मदत देणे.
योजनेची एकूण रक्कम : – 540000/-
प्रति गट मंजूर रक्कम माडिया :- 200000/-
प्रति गट मंजूर रक्कम बिगर माडिया :- 170000 /-
यापूर्वी जनजागृती नोट दिल्यामुळे इतर सर्व योजनांना भरघोस प्रतिसाद आपण दिलेला आहे. मात्र या योजनेस पुरेसे पात्र अर्ज आलेले नसल्यामुळे, त्याची दुसऱ्यांदा जनजागृती नोट देण्यात येत आहे.
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत केंद्रवर्त्ती अर्थसंकल्प योजना सन 2022-23 अंतर्गत अहेरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अहेरी / मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटाकरिता वरील योजना मंजूर आहे. तेव्हा ईच्छूक आदिवासी महिला बचत गटाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनाचे अर्ज या कार्यालयालातून विनामूल्य घेऊन जावे व 10 दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरुन अर्ज या कार्यालयास सादर करावा.
*टिप :- या योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे*
1.जातीचा दाखला 2.ग्रामसभा ठराव 3. बँक पासबुक प्रत आधार लिंक असणे आवश्यक 4. योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र 5.आधार कार्ड 6. राशन कार्ड 7.उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदार यांचे 8.महिला / पुरुष समूह / गट नोंदणी प्रमाणपत्र 9.गटाचा ठराव 10.गटाचा फोटो 11 जमिनीचा 7/12 उतारा इ.कागदपत्र अर्जासोबत जोडने आवश्यक
वरील प्रमाणे या योजनेचा जास्तीत जास्त आदिवासी महिला बचत गटांना अर्ज भरण्याचे आव्हाण याव्दारे करण्यात येत आहे.
*यापूर्वी सुद्धा या योजनेची जनजागृती* *नोट प्रसिद्ध केली होती* *परंतू पुरेशा आदिवासी* *महिला बचत गटाकडून* *प्रतिसाद मिळालेला* *नसल्याने पुनश्च आदिवासी महिला* *बचत गटांना या* *योजनेकरिता अर्ज करण्याचे आव्हान* *करण्यात येत आहे*
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
अहेरी जि.गडचिरोली.