50 टक्के सवलत एसटी महामंडळाच्या आदेशाची प्रत भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता यांच्या हस्ते महिलाना वाटप
मुलचेरा:-
शिंदे-फडणवीस सरकारने सन 2022-23 च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ” महिला सन्मान योजना ” म्हणून ओळखले जाईल.
महिला सन्मान योजना ची जनजागृती नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात 18 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष श्री प्रकश दत्ता यांच्या नेतृत्वात एसटी महामंडळाच्या 50 टक्के सवलतिची आदेशाची प्रत महिलांना वाटप करून जनजागृती करण्यात आली.शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे महिलेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी सौ प्रभाती भक्त तालुका महिला आघाडी अध्यक्ष मुलचेरा,सौ अनिता श्यामल सरकार तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष मुलचेरा, श्री शंकर दास तालुका कोषाध्यक्ष भाजपाचे तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच बस मध्ये प्रवास करणारे महिला सौ चंद्रमाला रॉय विजयनगर, सुमित्रा हालदार सुंदरनगर,प्रमिला कन्नाके रेंगेवाई, वनिता आत्राम रेंगेवाई,वनिता आत्राम रेंगेवाई, उषाताई मोहूर्ले मक्केपल्ली, राजेश्वरी मडावी बंदुकपल्ली, दादाजी कन्नाके रेंगेवाही आदी प्रवासी उपस्थित होते.