मुंबई, दि. ६ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले असून संगीताचा आवाज लोपला आहे, त्यामुळे प्रत्येक चाहता आज नि:शब्द आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
तीन पिढ्यांशी समरस झालेल्या लतादीदी या ईश्वराची देण होत्या, त्या पुन्हा होणे नाही. “मेरी आवाज ही पहचान है”, हे त्यांचे शब्द अजरामर ठरणार आहेत. संगीत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे असे सांगून मंत्री अशोक चव्हाण यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
