ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्याचे नाव उज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील:भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

चंद्रा येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन संपन्न

अहेरी: जिल्ह्यात नेहमीच विविध ठिकाणी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जातात.या स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील खेडाळू हिरीरीने भाग घेतात आणि चांगले क्रीडा कौशल्य दाखवतात. विविध ठिकाणी आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे. या माध्यमातून नक्कीच राज्याचे नाव उज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.अहेरी तालुक्यातील चंद्रा येथे वीर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळ तर्फे भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य ऋतुराज हलगेकर,माजी प स सदस्य हर्षवर्धन राव आत्राम,माजी सरपंच बालाजी गावडे,देवाजी सडमेक,ईश्वर आलाम,लक्ष्मण मडावी,गोविंदा वेलादी,रंगाजी तलांडे,जगन्नाथ आलाम,मोहन वेलादी,सुरेश सोयाम,शीतल मडावी,नागेश कुमरे,रवी वेलादी,मोरेश सिडाम तसेच चंद्र गावातील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ग्रामीण भागात उत्कृष्ट खेळाडू आहेत. मात्र शालेय जीवनात ज्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळते आणि विविध स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होतात तेच खेडाळू पुढे जातात. शिक्षणात खंड पडलेल्या युवकांमध्येही अनेक सुप्त गुण दडलेले आहेत. मात्र त्यांना पाहिजे त्या प्रमाणात संधी आणि मार्गदर्शन नसल्याने अनेक युवकांना मिळणाऱ्या संधीपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे शिक्षणात खंड न पडू देता शिक्षण घेतानाच विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्वतःचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक करा असे आवाहन यावेळी भाग्यश्री आत्राम यांनी केले.यावेळी परिसरातील विविध क्रिकेट चमू आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.