चक्रीवादळानंतर आता मान्सून सक्रिय होण्यासाठी पुरक वातावरण तयार झाले आहे. मान्सून संपूर्ण राज्यात येत्या 72 तासांत पोहचणार आहे. आज (24 जून) राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना पावसापासून वाचण्याचे साहित्य सोबत बाळगा असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे
Related Articles
मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्यांसाठी मोठी बातमी
मद्यसेवन करून तसेच विना परवाना बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल (15 मे) आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये, यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे सांगून हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे […]
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आजअखेर ३ अर्ज दाखल
मुंबई, दि. 13 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता श्री. राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), श्री. मिलिंद काशिनाथ कांबळे […]
तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. ३० : “तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर प्रमुख देश म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर अधिक भर द्यावा”, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कापड उत्पादक असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित केलेल्या 76 व्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील […]