मुंबई दि 9 : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे दुःखद निधनामुळे भारत सरकारने दि. 11 सप्टेंबर, 2022 रोजी संपूर्ण देशभर दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी मुंबई, राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश श्री. उदय उमेश लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आलेला आहे, असे अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी कळविले आहे.
Related Articles
‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक मुंबई, दि. 22 : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव […]
महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज
मुंबई, दि.26 : ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर तसेच सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित सिरोंच्या येथे पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न
बॅडमिंटन स्पर्धेला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती. सिरोंच्या:- स्थानिक क्रीडा संकुलन येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने तीन दिवसीय पुरुष बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या पुरुष बॅडमिंटन स्पर्धाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आणि प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते अवधेश्वरराव बाबा आत्राम हे […]