ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विविध कार्यक्रमानी राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मूलचेरा येथील युवकांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार

मूलचेरा:-
माननीय माजी आदिवासी व वन राज्यमंत्री तथा युवा हृदय सम्राट, अहेरी इस्टेट चे राजे आदरणीय श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक मूलचेरा तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे मधील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आणि सोबतच स्वामी विवेकानंद छात्रवास येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, व वृक्षारोपणचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वामी विवेकानंद छात्रवास येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, सचिव सुभाष गणपती, उपसरपंच तापन मलिक, महामंत्री निखिल हलदार, ग्रामपंचायत सदस्य बादल शाह,नगरसेवक दिलीप आत्राम,युवा नेते गणेश गारघाटे,किशोर मल्लिक, प्रा.प्रवीण कुमरे,प्रफुल दुर्गे, अक्षय चुधरी,मिलिंद कोवे, अक्षय खिराटकार, अभय मडावी निहार मेश्राम आणि राजे अम्ब्रिशराव महाराज समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.