दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत
अहेरी शहरातील इंदिरानगर बेघर कॉलनी येथील सुरेश आलाम यांना कर्करोगाने ग्रासले परंतू आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खर्च झेपत नसल्यामुळे अर्धवट ऊपचार करुन नागपुरातुन परतावे लागले.
कुटूंबीयांनी आपली व्यथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा पर्यत पोहोचवली. गोर गरीबांच्या मदतीला सदैव तत्पर असणार्या दानशूर राजे साहेबांनी लगेच कुटूंबियांना बोलावून घेत आर्थिक मदत दिली तसेच पुढील ऊपचाराची व्यवस्था सुध्दा लावून दिली.
क्षेत्रातील जनतेची सदैव काळजी घेणारे राजे साहेबांच्या दातृत्वाबद्दल सर्वत्र आभार व्यक्त केल्या जात आहे.राजे’ म्हणून सर्वमान्यता ऊगाच प्राप्त होत नाही