अहेरी:-
भामरागड-एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिथे अद्यापही विज व गॅस पोहोचणे दुरापास्त आहे अशा भागात प्रकाशाचे किरण ठरलेले ऊर्जा मित्र टिमची दखल भारत सरकारने घेतली.भारतीय ऊद्योग संघ (CII) मार्फत दिल्लीला होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील “आत्मनिर्भर भारत प्रदर्शनी” मध्ये प्रकल्प सादर करण्यासाठी या टिमला आमंत्रीत करण्यात आले. अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात जनजागृती करणे व लोकांना या क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी प्रेरीत करतांना या टिमला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असतो.आंतरराष्ट्रीय मंचावर प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणे ही फार मोठी ऊपलब्धी आहे परंतु आधीच आर्थीक विवंचनेचा सामना करणार्या संस्थेला दिल्लीला प्रकल्पाची प्रतीकृती व चमु नेणे अशक्यप्राय होते.चमुने माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांकडे आपली व्यथा मांडली.राजे साहेबांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना प्रदर्शनीला जाण्यासाठी आर्थिक मदत केली.अक्षय्य व अपारंपारीक ऊर्जेचे काम या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढवावे यासाठी प्रोत्साहीत केले.
