नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
एकूण जागा – 661
पुढील पदांसाठी भरती
- सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 339 पदे
- कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – 322 पदे
-
सहाय्यक अभियंता
- उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.
- मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेलं असणं आवश्यक.
- संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
- पदभरतीच्या सर्व अटी व शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.
- पे-स्केल : 49210-2165-60035-2280-119315 रुपये
कनिष्ठ अभियंता
- उमेदवारांनी संबंधित पदानुसार Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक.
- मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेलं असणं आवश्यक.
- संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.
- पदभरतीच्या सर्व अटी व शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.
- पे- स्केल – 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये
आवश्यक कागदपत्रे
- बायोडेटा
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (राखीव उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.mahagenco.in/career/
मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.