गडचिरोली: जिल्हा सैनिक कल्याण कक्ष,गडचिरोली करीता सैनिक प्रर्वगामधुन अशासकीय,निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन रुपये 13,323/- कंत्राटी पध्दतीने कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक 2 पदे ( 175 दिवसा करीता फक्त्) भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छूक माजी/आजी माजी सैनिक पत्नी /विधवा पत्नी यांनी या कार्यालयात दिनांक 07 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 12.30 वाजता सैन्य सेवेतील संपुर्ण मुळ आणि छायांकित कागदपत्रासह मुलाखती करीता हजर रहावे.(अशासकीय कल्याण संघटक या पदा करीता सैन्यातील नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा वरील हुद्यांवर काम केलेल्या संवर्गातून तसेच अशासकीय लिपीक टंकलेखक या पदाकरीता इंग्रजी टंकलेखन 40 व मराठी टंकलेखन 30 प्रमाणपत्र तसेच संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.) असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.
Related Articles
राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 14 : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख तरुणांना हवामान बदलाचे योद्धे म्हणून कार्य करण्याची संधी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज मुंबई विद्यापीठ येथे उच्च […]
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घवघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ येथे २०१५ […]
भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची निर्यात करणार
BrahMos supersonic missiles संरक्षण क्षेत्रात पूर्णपणे स्वावलंबी होण्याच्या भारताच्या प्रयत्नात लवकरच आणखी एक यशाची भर पडणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DDO) या वर्षी मार्चपर्यंत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची निर्यात सुरू करेल. खुद्द डीआरडीओचे प्रमुख समीर व्ही. कामत यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, डीआरडीओ येत्या 10 दिवसांत या […]